Search This Blog

Wednesday, 18 February 2026

शिवजयंती निमित्त पदयात्रेचे आयोजन

 शिवजयंती निमित्त पदयात्रेचे आयोजन

चंद्रपूर, दि. 18 :  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर शहर महानगरपालिका, नेहरु युवा केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी 2026 ला सकाळी 7 वाजता शिवजयंती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पदयात्रेत लोकप्रतिनिधींसह अधिकारी, शिक्षक, क्रीडा शिक्षक, नागरीक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातू चंद्रपूर शहरात रॅली काढण्यात येणार आहे. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येथून, महात्मा गांधी चौक-आझाद बगीचा -गिरणार चौक -महात्मा गांधी चौक आणि मनपा पार्कींग येथे पदयात्रा समाप्त होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment