Search This Blog

Thursday, 12 February 2026

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा




व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Ø राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीची मागणी

चंद्रपूरदि. 12 : राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियेाजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे बुधवारी (दि.11) सन 2026-27 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचाजिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतलायावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांनी वाढीव निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीला वित्त व नियेाजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वालआमदार सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूरतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार देवराव भोंगळे (राजुरा), आमदार किशोर जोरगेवार (चंद्रपूर), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याकरीता शासनाकडून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 358 कोटी 89 लक्ष रुपयेअनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी तर आदिवासी उपयोजनेकरीता 111 कोटी 48 लक्ष रुपयेकमाल वित्तीय मर्यादेत मंजूर केले आहेमात्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अंमलबजावणी यंत्रणामार्फत एकूण 1134 कोटी 15 लक्ष 24 हजार एवढी अतिरिक्त मागणी केली आहेराज्यस्तरीय बैठकीत उपस्थित आमदारांनीसुध्दा जिल्ह्याकरीता अतिरिक्त निधी वाढवून द्यावाअशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीजिल्हा वार्षिक योजनेची वित्तीय मर्यादा 358 कोटींवरून 600 कोटींपर्यंत वाढवून द्यावी, 3 वर्षात मामा तलावांचे नुतणीकरण करावे, 150 कोटींचे वूड म्युझियम तयार करून  रिसर्च म्युझियम म्हणून त्याला मान्यता द्यावीधानाचा बोनस त्वरीत द्यावाजलजीवन मिशन मध्ये चंद्रपूरला 508 कोटी रुपये द्यावेपोंभुर्णा आणि करंजी येथे आदिवासी एमआयडीसीची घोषणा करावीवीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या 137 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता द्यावीएसएनडीटी महिला विद्यापीठासाठी त्वरीत निधी द्यावामुल पॉलिटेक्निक कॉलेज व गोंडवाना विद्यापीठाला निधी द्यावाअशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते (व्हीआरइतर जिल्हा मार्ग (ओडीआरकरीता तसेच जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता निधी व जिवतीमध्ये सिंचनाचा प्रकल्प देण्याची विनंती केलीआमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिरासाठी तसेच धानोरा बॅरेजसाठी बजेटमध्ये निधी द्यावाअशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

जिल्हाधिका-यांकडून सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणसन 2026-27 बाबत माहिती दिलीयात मागील सात वर्षातील मंजुर नियतव्ययजिल्ह्यात विविध स्त्रोतातून प्राप्त होणारा निधीगाभा व बिगर गाभा क्षेत्रहनिहाय जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा 2026-27, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयजिल्हा शक्य चिकित्सक कार्यालयमा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयजि.शिक्षण विभागमहिला व बालकल्याणमुख्य वनसंरक्षकजिल्हा पोलिस अधिक्षकसार्वजनिक बांधकाम विभागजि.बांधकाम विभागपशुसंवर्धन व दुग्धविकासलघुपाटबंधारे विभागमृद व जलसंधारण विभागजि.ग्रामपंचायत विभागनगरपालिका प्रशासनग्रामीण पाणी पुरवठाजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयनाविन्यपूर्ण योजना आदींबाबत मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment