Search This Blog

Tuesday, 10 February 2026

18 फेब्रुवारी रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम


18 फेब्रुवारी रोजी महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

चंद्रपूरदि. 10 : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जारुपाली चाकणकर ह्या 18  फेब्रुवारी 2026 रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून 18 फेब्रुवारी  रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन कार्यालयचंद्रपूर येथे महिलांच्या समस्येकरिता महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत जनसुनावणी घेणार आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या महिलांना त्यांच्या समस्येबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे निवेदन करावयाचे आहेत्यांनी 18 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृहचंद्रपूर या ठिकाणी जनसुनावणीस उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे  करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment