Search This Blog

Saturday, 28 February 2026

चोरगाव येथे १५ दिवसीय बांबू क्राफ्ट प्रशिक्षण शिबिराचा समारोप

 

चोरगाव येथे १५ दिवसीय बांबू क्राफ्ट प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Ø बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रचा उपक्रम 

Ø महिलांना रोजगाराची नवी दिशा

चंद्रपूरदि. 28 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत ‘कॅम्पा सन २०२५-२६’ मोहिमेअंतर्गत चोरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या १५ दिवसीय विशेष बांबू प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप करण्यात आला. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांना बांबू कलेचे आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चोरगाव येथील महिलांसाठी आयोजित ‘ट्रेनिंग कम प्रोडक्शन’ (प्रशिक्षण व उत्पादन) या संकल्पनेवर आधारित वर्गामध्ये महिलांना बांबूपासून आकर्षक प्रसाद बॉक्स तसेच कलात्मक बांबू ज्वेलरी (दागिने) तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या बांबूचा वापर करून बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तूंची निर्मिती कशी करावीयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वेलमे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार,   चोरगावच्या सरपंच तृणाली धंदरेवनपाल सचिन टेकामप्रशिक्षण केंद्राच्या पर्यवेक्षक योगिता साठवणे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना आकाश मल्लेलवार यांनी सांगितले कीबांबू हा केवळ नैसर्गिक स्रोत नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सक्षम इंजिन ठरू शकतो. महिलांनी या कलेचा उपयोग करून स्वतःचे लघुउद्योग सुरू करावेतजेणेकरून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यावेळी वेलमे मॅडम म्हणाल्या कीमहिलांना उत्पादनासाठी लागणारा बांबू विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाईल. तसेचज्या महिलांना पुढील प्रगत प्रशिक्षणासाठी  चिचपल्ली येथे यायचे आहेत्यांच्यासाठी वाहतुकीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या बांबू वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे चोरगाव परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून बांबू हस्तकलेला नवी चालना मिळणार आहे. सदर प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी केले. सहाय्यक म्हणून सुनिता मोकाशे तसेच प्रशिक्षक ‘बांबू सखी’ स्वाती रोशन जुमडे व मानसी भडके यांनी मोलाचे योगदान दिले.

००००००

No comments:

Post a Comment