27 व 28 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 26 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय
संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा मराठी
भाषा समितीद्वारे 27 व 28 फेब्रुवारी रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक
वाचलनालय, चंद्रपूर येथे ग्रंथोत्सव तसेच ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध
साहित्यीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता डॉ.
श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते
ग्रंथपुजन व ग्रंथदिंडीचे आयोजन, दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच्या
संधी आणि आव्हाने या विषयावर परिसंवाद होणार आहे.
दि. 28 फेब्रुवारी
रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत वाचन संस्कृतिच्या विकासात सार्वजनकि ग्रंथालयाचे
योगदान या विषयावर परिसंवाद, दुपारी 3 वाजता कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 वाजता समारोपीय
कार्यक्रम व आभार प्रदर्शन होईल. ग्रंथविक्री दोन्ही दिवस सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत
सुरू राहणार आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे यांनी कळविले
आहे.
००००००
No comments:
Post a Comment