22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा
चंद्रपूर, दि.20 : वरोरा येथे स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, सद्भावना चौक अभ्यंकर वार्ड येथे 22 फेब्रुवारी, 2026 रोजी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात येत आहे .त्यामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॅाल लागणार असून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सदर महाशिबीरात उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment