जिल्हा युवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 27 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेच्या वतीने सन 2024-25 व 2025-26 या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वैयक्तिक स्वरुपात एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरुप युवक व युवती यांना प्रत्येकी 10 हजार रुपये रोख, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे असून या पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय 13 ते 35 वयोगटातील असावे. तसेच संस्था ह्या सार्वजिनक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेकरिता पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून अथवा www.maharashtra.gov.in (संकेतांक २०१३१११२११२२०४३३२१) या संकेतस्थळावरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेला विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावा. आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव 20 एप्रिल 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment