Search This Blog

Wednesday, 4 February 2026

साफसफाई करण्याकरीता निविदा सादर करण्याचे आवाहन


साफसफाई करण्याकरीता निविदा सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 04 : प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर येथील कार्यालयीन इमारतकार्यालयीन परिसर व तीनही मजल्यावरील पुरुष व महिला प्रसाधनगृहांची दैनंदिन साफसफाई इत्यादी कामांकरिता इच्छुक बेरोजगारसहकारी सोसायटी / सेवासंस्था यांच्यामार्फत सन 2026-27 या वर्षासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात येत आहेसिलबंद दरपत्रके 11 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी वाजेपर्यंत सेवा पुरवठा कंत्राटदार सेवा संस्थेनी निविदाप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयजलनगरचंद्रपूर या पत्त्यावर सादर करावी.

अटी व शर्ती : 1. सफाई बाबत निविदा असे दर्शनी भागावर नमुद करून सिलबंद दरपत्रके सादर करण्यात यावी. 2. दरपत्रके मान्य झाल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर यांच्याशी 100 रुपयांच्या मुद्रांक पेपरवर शर्ती व अटी मान्य असल्याबाबतचे करार करून नोटरी करून घेणे बंधनकारक राहील. (अटी व शर्तीची विस्तृत माहिती नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.) 3. दरपत्रक मंजुर करणे व नाकारणे इत्यादी अधिकार या कार्यालयाने राखून ठेवलेले आहेतअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment