मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत निवड चाचणीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 27 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मिशन लक्ष्यवेध ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत विभागीय क्रीडा निपुणता केंद्र, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग, नागपूर येथे स्थापन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने टेबल टेनिस आणि अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकाराची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
सदर निवड चाचणी करिता निकष खालीलप्रमाणे आहे.
अॅथलेटिक्स : वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले मुली. (त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)
आवश्यक कागदपत्रे : जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ , शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ. महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू, गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक. शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.
टेबल टेनिस : वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले/ मुली (त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)
आवश्यक कागदपत्रे : जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ ,शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ. महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू. गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती 2 चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक. शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.
निवड चाचणीकरीता जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे 10 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नोंदणी करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरिता क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे यांच्याशी संपर्क साधावा.
००००००

No comments:
Post a Comment