Search This Blog

Friday, 6 February 2026

सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी




 

सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी

Ø पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक

चंद्रपूरदि. 06 : जिल्ह्यास विविध स्त्रोतातून प्राप्त होणा-या निधीतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जातो. यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व इतर योजनांचा समावेश आहे. सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी मंजूर नियतव्ययाव्यतिरिक्त 658 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि.6) नियोजन सभागृह येथे पार पडली. यावेळी आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटींवार (बल्लारपूर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), देवराव भोंगळे (राजुरा), करण देवतळे (वरोरा), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्यवनसंरक्षक एम.एन.रामानुजनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त नरेश अकुनूरीप्र.जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरेप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारसहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतूरे यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासनाकडून सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेकरीता 358 कोटी 89 लक्ष रुपयेअनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी तर आदिवासी उपयोजनेकरीता 111 कोटी 48 लक्ष रुपये,  कमाल वित्तीय मर्यादेत मंजूर करण्यात आले आहेमात्र पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जिल्हा नियेाजन समितीच्या बैठकीतजिल्हा वार्षिक योजनेच्या 358 कोटी व्यतिरिक्त अधिकचा 450 कोटींचा निधीअनुसूचित जाती उपयोजनेच्या 75 कोटी व्यतिरिक्त अधिकचा 58 कोटी आणि आदिवासी उपयोजनेच्या 111 कोटी व्यतिरिक्त अधिकचा 150 कोटी अशी एकूण 658 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बैठकीत 26 सप्टेंबर  2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास व अनुपालन अहवालास मंजुरी देण्यात आलीतसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2025-26 अंतर्गत मंजूर कामे व माहे जानेवारी 2026 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आलाजिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2026-27 च्या शासनाची वित्तीय मर्यादा लक्षात घेऊन एकूण 545 कोटी 36 लक्ष 82 हजार रुपये खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला.

या बैठकीत अंमलबजावणी यंत्रणामार्फत एकूण 1134 कोटी 15 लक्ष 24 हजार एवढी अतिरिक्त मागणी केलेली आहेयात सर्वसाधारण योजनेसाठी 821 कोटी 93 लक्ष 73 हजारअनुसूचित जाती उपयोजनामध्ये 58 कोटी 69 लक्ष 69 हजारआदिवासी घटक कार्यक्रमासाठी 253 कोटी 51 लक्ष 82 हजार रुपये एवढी अतिरिक्त मागणी आहे.  प्रस्तावित राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी वाढवून घेऊअसे राज्याचे आदिवासी विकास मंत्री  तथा पालकमंत्री.डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.

पुढे ते म्हणालेलोकप्रतिनिधी हे विकास कामांसाठी आग्रही असणे स्वाभाविक आहेविविध विभाग प्रमुखांनी समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांप्रती अधिक सकारात्मक राहून लोकप्रतिनिधींना अनुपालन अहवालातील माहिती तात्काळ दिली पाहिजेजिल्ह्याच्या सीमेवर तसेच इतर ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे यंत्रणेने नियोजन करावेप्रत्येक तालुका स्तरावरील विश्रामगृह हे सुसज्ज व सोयीसुविधायुक्त करावेजिल्ह्यातील सीकलसेल ॲनेमिया  व हत्तीरोग निर्मुलनासाठी अधिक प्रभावी मोहीम राबवावीजिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमी नसणे हे दुर्दैवी आहेविकास कामांमध्ये ग्रामपंचायत भवन आणि गावात स्मशानभुमीचे बांधकाम प्राधान्याने घ्यावेवीज कनेक्शनअभावी प्रादेशिक पाणी  पुरवठा योजना बंद ठेवू नकाअशा सुचना पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिल्या.

बैठकीच्या सुरवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

 विशेष अभिनंदनाचा ठराव : जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगले काम करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहेया बाबीची दखल घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष अभिनंदनाचा ठराव मांडलाजिल्हा नियोजन समितीने एकमुखाने या ठरावास मान्यता देऊन जिल्हाधिकारी श्रीगौडा व पोलिस अधिक्षक श्रीसुदर्शन यांचे विशेष कौतुक केले.

०००००००

 

No comments:

Post a Comment