सिपेटच्या पहिल्या तुकडीला प्रमाणपत्र वाटप
चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कौशल्य विकासाची घोषणा केली होती. चंद्रपूरमध्ये सेन्ट्रल इन्स्टिटयुट ऑफ प्लॅस्टीक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था सुरु करुन गरीब, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील मुलांना रोजगार मिळत आहे. केंद्रीय मंत्री म्हणून या विभागासाठी हे काम करु शकल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.
विदर्भातील सर्वात प्रभावी असणा-या या प्रशिक्षणाला आगामी काळात वैभव प्राप्त होणार आहे. पहिल्याच तुकडीतील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याचा आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील कौशल्य विकास उपक्रमाचे हे जीवंत उदाहरण आहे. चंद्रपूरमधील औद्योगिक संस्थांनी या प्रशिक्षणार्थ्यांना स्थानिक स्तरावरही संधी दयावी, असे आवाहन केले.
केंद्रीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री असताना मला या प्रशिक्षणाबद्दल कळले होते. त्यावेळी या इन्स्टिटयुटमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेच रोजगार उपलब्ध होतो. ही बाब मला लक्षात आली. त्यामुळे ही संस्था आपल्या येथे मिळावी यासाठी प्रयत्न केले, त्याला यश आले. भारतात 27 ठिकाण ही संस्था चालते. त्यात चंद्रपूरचा सहभाग आहे. ही संस्था या ठिकाणी सुरु करुन शकल्याबद्दल आज खरा आनंद होत आहे.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, वरोराचे नगराध्यक्ष एहेतशाम अली, माजीमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनील फुलझेले, सिपेटचे प्रकल्प प्रमुख मिलिंदकुमार भरणे उपस्थित होते.
भारत सरकारच्या रसायणे, खते मंत्रालयातंर्गत येणा-या केमीकल आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या अंतर्गत चंद्रपूर येथे सेन्टर यून्स्टिटयुट प्लॉस्टिक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था काम करते. महाराष्ट्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर येथे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत प्रशिक्षण मिळालेल्या 90 टक्के मुलांना चांगल्या कंपनीत हमखास नोकरी मिळत आहे. या संस्थेची सुरुवात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे पेट्रोकेमिकल विभाग असताना झाली. ही संस्था चंद्रपूरच्या वैभवात भर घालणारी संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या बॅचच्या मुलांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम हॉटेल एनडीमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हयातील शासकीय, गैरशासकीय औद्योगिक संस्था, विविध व्यापारी संघटना, व्यापार उद्योग समूहातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन सिध्दार्थ दाभाडे यांनी केले. आदिवासी गावातील विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठीत कंपनीत नोकरी लागल्यानंतरचे मनोगत या कार्यक्रमाचे वैशीष्टय ठरले. या कार्यक्रमाला एससीसी, अल्ट्राटेक, माणिकगड, सिटीपीएस, डल्ब्युसिएल, एमईल, अंबुजा सिमेंट आदी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या कौतुक सोहळयाला उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment