Search This Blog

Tuesday, 27 November 2018

जिल्हयातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही : देवराव भोंगळे



गोवर रुबेला लसीकरणाला जिल्हयात उत्साहात सुरुवात

चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खात्री आरोग्य यंत्रणेच्या तयारीवरुन व शिक्षण विभागाच्या पाठबळावरुन दिसून येते. प्रत्येक पालकांने आपले पाल्य निरोगी राहावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी होईल, याची मला खात्री असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज दूर्गापुर येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. 
            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोडजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठेजिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडामनागपूर येथील कुटुंब कल्याण विभागाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गोगुलवार, डॉ.मंगेश गुलवाडेनागपूरचे डब्ल्युएचओचे डॉ.श्रीधर,डॉ.शैलेश बागला, डॉ.तरपचंद भंडारी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुर, डॉ.माधुरी मेश्राम, डॉ.अमित जयस्वाल आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात आजपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना महाराष्ट्राला गोवर रुबेला सारख्या घातक आजारापासून मुक्त्त करण्यासाठी आज राज्यभर या मोहिमेची सुरुवात होत आहे. यामध्ये चंद्रपूर मागे राहता कामा नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बालकांमध्ये लहान वयातच प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व यंत्रणा हातात हात घालून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक महिण्‍याची यंत्रणाची ही मेहनत असून यातून शंभर टक्के लसीकरण हेच उद्दिष्ट साध्य झाले पाहीजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वीस राज्यामध्ये ही मोहीम राबविली जात असून महाराष्ट्र यामध्ये शंभर टक्के लसीकरण करेल अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बालकांशी संवाद साधतांना त्यांनी तुम्ही लसीकरण केले. इंजेक्शन घेतले. ही माहिती आपल्या जवळच्या तीन मित्रांना देवून त्यांनी लसीकरण करुन घेण्याची प्रेरणा दयावी, असे आवाहन केले.
आजपासून सुरु झालेल्या या मोहिमेत संपूर्ण जिल्हयामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून शहरात महानगरपालिका तर जिल्हयामध्ये जिल्हा परिषद व ठिक ठिकाणच्या नगरपालिकांमार्फत कार्यवाही होणार आहे.  यावेळी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक पापळकर यांनी केले.  
कार्यक्रमाचे संचालन जनता विद्यालयाच्या शिक्षिका सुनीता पोटे यांनी केले. लसीकरणाला या विद्यालयातील चिमूकल्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.
                                                            0000

Monday, 26 November 2018

आजपासून जिल्हयामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात


100 टक्के लसीकरण करण्याचे
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे आवाहन
  
चंद्रपूरदि.26 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयामध्ये उदया दिनांक 27 नोव्हेंबर मंगळवारपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. उद्या दुर्गापूर येथे दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते तर महानगरपालिका हद्दीमध्ये नेताजी चौकातील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये महापौर अंजलीताई घोटेकर व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. 
चंद्रपूर जिल्हयातील गोवर रुबेला लसीकरणाच्या 100 टक्के अमंलबजावनीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.  यामध्ये 100 टक्के शाळापालक व वैदयकिय व्यवसायिकांनी सहभागी होणार असून जिल्हयातील  9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण  करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यानुसार 27 नोव्हेंबर  2018 पासून महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. सदर मोहिम 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्हातील सर्व शाळा,सरकारी, निमसरकारीखाजगीअनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळामदरसेसिबीएससीआयसीएससी, केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे. याकरीता लायन्स क्लब, रोटरी क्लबआयएएम, आयएपी,  निमा, युनानी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील 4,43582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेत 100 टक्के लसीकरणाचे करण्याचे  निर्धारीत केले आहे.
                                                            000  

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करा : ओमप्रकाश यादव



महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याण मंडळातर्फे सुरक्षा साधनांचा वाटप

चंद्रपूर, दि 26 नोव्हेंबर : आपल्या मनातली घरे बांधणारे, आपल्या निवाऱ्याची सोय करणारे, इमारत व इतर बांधकाम करणारे कामगार यांना शासन विविध सोयी सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे आपल्या अवतीभवती असणाऱ्या गरजू व गरीब कामगारांना राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडे आपल्या नावाची नोंदणी करायला सांगा,असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश यादव यांनी आज येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत झालेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील शेकडो कामगार उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधतांना ओमप्रकाश यादव म्हणाले, राज्य शासन कामगारांना घरे, सुरक्षा आणि आरोग्यदायी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहे. 28 प्रकारच्या विविध सामाजिक योजना कामगारांसाठी सज्ज आहेत. तथापि, त्यासाठी कामगारांची नोंद होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत विविध योजना तयार केलेल्या आहेत. मात्र नोंदणी नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित आहेत. त्यामुळे जे खरोखर बांधकाम कामगार आहेत, त्यांना या योजनेची माहिती देण्याचे आवाहन देखील यावेळी जमलेल्या  कामगार बांधवांना त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरसहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, उपमहापौर अनिल फुलझेलेदिशा सदस्य खुशाल बोंडेमहाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समितीचे सदस्य ॲड. शैलेश मुंजेइमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सदस्य अशोक भुताळ आदी उपस्थित होते.
2014 पासून कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मोठ्या प्रमाणात राज्यात नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत 12 लाख कामगारांची नोंद झाली आहे. त्यांच्यासाठी विविध योजना असून या योजनेचा लाभ लोकांपर्यंत जावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी यावेळी चंद्रपूरमध्ये या कामगारांची मोठी संख्या असताना देखील नोंदणी कमी आहे. त्यामुळे या नोंदणीला गती देण्याबाबत संबंधित विभागाने प्रयत्न करावेअसे आवाहन यावेळी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकरयांनी देखील सर्व संबंधित यंत्रणांनी नोंदणीकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या नोंदणीला गती दिली जाईल असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते नोंदणीकृत कामगारांना पाच हजार रुपयांचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. अन्य नोंदणीकृत कामगारांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा केला जाणार आहे. याशिवाय या वेळी कामगारांना सुरक्षा साहित्याचे देखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बांधकाम  कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ज्योती तोहगावकर यांनी केले.

चंद्रपूरमध्ये प्रशासकीय भवनात नोंदणी !

चंद्रपूर जिल्हयातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना केवळ पंचवीस रुपयांमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकतात.  यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रवयाचा पुरावारहिवासी पुरावाछायाचित्रासह ओळखपत्रबँक पासबुकची प्रतपासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील यासंदर्भातील कामगार नोंदणी कार्यालय हे प्रशासकीय भवनामध्ये तळ माळ्यावर बस स्टँड पुढे आहे. या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कोणत्याही कामगार आपल्या नावाची नोंद करू शकतो. राज्य शासनातर्फे 28 योजना कामगारांसाठी सध्या कार्यरत असून याचा लाभ घ्यावा, असे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कामगार कार्यालयाच्या 07172-252028 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                                                       000

Friday, 23 November 2018

छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाखाचा धनादेश सुपूर्द


चंद्रपूर दि 23 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनातर्फे नागभिडचे ठाणेदार दिवंगत पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखाचा धनादेश काल  दि. 22 नोहेंबर रोजी देण्यात आला.
       राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार  यांच्या  सूचनेवरून काल गुरुवारी रात्री महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी  डॉ. कुणाल खेरणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेशकुमार रेड्डी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सुहास अलमस्त, आदींच्या उपस्थितीत चिडे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून  हा धनादेश देण्यात आला.
             पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे यापूर्वीच कुटुंबीयांची भेट घेऊन जाहीर केले आहे. महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत राज्य शासनातर्फे चिडे यांचा निवास असणाऱ्या तुकूम येथील शिवनगर अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन ही मदत करण्यात आली. महापौर अंजलीताई घोटेकर  व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरनार यांनी सन्मानपूर्वक हा धनादेश चेक मधुरीताई छत्रपती चिडे यांना सुपूर्द केला आहे. यावेळी अमिन शेख, राजू गोलिवार .संजय मुसळे, शीला चव्हाण, गणेश कुळसंगे, प्रदीप गडेवार ,पुरुषोत्तम सहारे आदी उपस्थित होते.
0000

Thursday, 22 November 2018

चंद्रपूर जिल्हयातील 100 टक्के बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे आवाहन



जिल्हातील सर्व यंत्रणा सज्ज 27  नोव्हेंबर पासुन प्रत्यक्ष लसीकरण

चंद्रपूर, दि.22 नोव्हेंबर- चंद्रपूर जिल्हयातील गोवर रुबेला लसीकरणाच्या 100 टक्के अमंलबजावनीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात करण्यात येणार आहे. यामध्ये 100 टक्के शाळा, पालक व वैदयकिय व्यवसायिकांनी सहभागी होणार असून जिल्हयातील  9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवर, रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही डॉ.कुणाल खेमनार यांनी प्रत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपाचे अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडाम, आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद राऊत, डॉ.एम.जे.खान, डॉ.मंगेल गुलवाडे, नागपूरचे एसएमओ डॉ.श्रीधर, शैलेश बागला आदी उपस्थित होते.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण  करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  त्यानुसार 27 नोव्हेंबर  2018 पासून महाराष्ट्रात गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना लसीकरण करण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. सदर मोहिम 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. यात जिल्हातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सिबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विदयालय इत्यादी शाळामध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतच, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे. याकरीता लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयएएम, आयएपी,  निमा, युनानी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
चंद्रपूर जिल्हयाची शहरी व ग्रामिण क्षेत्र मिळुण एकूण लोकसंख्या  22,31,090 आहे. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील ग्रामीण/अर्बन भागातील      4,43, 582 व कार्पोरेशन भागातील 83,870 असे एकूण 5,27,452 मुलां-मुलींना  3244 शाळेच्या माध्यमातून तर 2306 अंगणवाडी/बाहयसत्रअंतर्गत मिळून असे एकूण 5550 सत्राचे नियोजित करुन लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या मोहिमेत 100 टक्के लसीकरणाचे करण्याचे  निर्धारीत केले आहे.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर-रुबेला या दोन्ही आजाराचे नियंत्रणाकरीता एक इंजेक्शन व्दारे लसीकरण केले जाणार आहे. गोवर हा अत्यंत संक्रामक आजार आणि घातक आजार आहे. हा मुख्यता लहान मुलांना होतो असून या आजारानंतर होणा़-या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होउ शकतो. तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नवीन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा,  मतीमंदत्व, हृदय विकृती होवू शकते. या करीता गोवर-रुबेला आजारापासून संरक्षणाकरीता सर्व मुलां, मुलींना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या पासुन कोणताही धोका नाही.
गोवर रुबेला मोहिम ( पार्श्वभूमी )
लहान वयाच्या मुलांच्या त्यसाठी गोवर हा आजार एक प्रमुख कारण आहे गोवर या आजाराची बाजारामध्ये किफायतशीर सुरक्षित लस उपलब् असली तरी लहानवयाच्या मुलांमध्ये या आजारामुळे त्यखी पडण्याचे प्रमाण खुप मोठे आहे.
सन 2015 मध्ये जगभरात जवळपास 1.35 लक्ष त्य हे केवळ गोवर या आजारामुळे झाली आहेत म्हणजे दररोज 367 त्य किंवा दर तासाला 15 त्यजगभरात होत आहेत.
गोवर लसीकरणामुळे सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये जगभरात गोवर या आजारामुळे त्यखी पडण्याचे प्रमाण 79 टक्के पर्यंत कमी झाले आहे सन 2016च्या जागतिक कडेवारीनुसार गोवर आजारामुळे होणा-या त्यपैकी अंदाजे 37 टक्के त्य हे भारतामध्ये झाले हेत.
गोवरच्या लसीकरणामुळे सन 2000 पासून सन 2015 पर्यंत सुमारे 2 करो गोवर मुळे होणा-या त्यूं प्रतिबंध लागला.
रुबेला हा एक संक्रामकसामान्यत सौम्य व्हायरल संसर्ग असून तो मुख्यत मुले आणि तरुण पिढीमध्ये होतो.
गर्भवती स्त्रीयामध्ये रुबेला या आजाराच्या संसर्गामुळे गर्भाचा मत्यु किंवा जन्मत दोष, (जसे अंधत्वबहिरेपणा आणि ह्रदय विकती ) होऊ शकत हे बालकजन्मजात रुबेला सिन्ड (सिआरएस) म्हणून ओळखले जाते.
जगभरातदरवर्षी एक लाखापेक्षा जास्त बालकांचा सिआरएस सह जन्म होतो रुबेला साठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही परंतु हा रोग लसीकरणाने प्रतिबंधित करता येतोदर वर्षी अंदाजे 40 ते 50 हजार जन्मजात रुबेला सिन्डोम (सिआरएस) केसेस भारतामध्ये होतात.मोहिमेसाठी लक्ष्य करण्यात आलेला वयोग 9 महिने ते 15 वर्षापर्यंतची मुले मुलीफक्त एकदा मोहिमेमध्ये लसीकरण रुन गोवर आणि रुबेला या दोन आजारापासून आपल्या बालकांना सुरक्षित करु शकता (जरी यापुर्वी देखील आपण आपल्या बालकासगोवर रुबेला चे लसीकरण  केले असेल तरी मोहिमेमध्ये लसीकरण करणे अनिवार्य आहे.
भारतामध्ये गोवररुबेला लसीकरणाची सुरुवात फेब्रुवारी 2017 पासून सुरु करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत 30 मे 2018 पर्यंत एकूण 19 राज्य केंद्र शासितप्रदेशामध्ये मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे  यामध्ये वळपास 9 कोटीहून अधिक बालकांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले महाराष्ट राज्यात हीमोहिम 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होणार आहे.लसीकरण 9 महिने ते 15 वर्षाखालील पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उदिदष्ट आहे.
                                                            0000