Search This Blog

Wednesday, 1 January 2025

जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

 जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित

Ø 15 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 01: जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशानेदरवर्षी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (महिलापुरुष व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात.

त्याअनुषंगानेसन 2024-25 करिता जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. क्र. 9423673232) यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्ज 15 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्विकारले जाणार नाही.

अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात 10 वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. अर्जदाराने वयाची 35 वर्ष पुर्ण केलेले असावे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे.

अर्ज करतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि. 14 डिसेंबर 2022 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्रसन्मानचिन्ह व रोख रु. 10 हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या युवकांना दि. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईलअसे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

000000

हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

 हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 01: चंद्रपूर शहरातील कोतवाली वार्ड येथील रहिवासी मनिंद्र गणेश यादव हा व्यक्ती काही न सांगता घरुन निघुन गेला. सदर व्यक्तीचा बस स्टँडरेल्वे स्टेशनवार्डामध्ये तसेच नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता आढळून आला नाही.

हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे:

मजबुत बांधाउंची 5 फुट 10 इंचरंग सावळाकेस बारीकचष्मा मोठया भिंगाचाचेहरा गोलअंगात क्रिम कलरचे शर्टनिळया रंगाचा फुल पॅन्टपायात काळ्या रंगाची चप्पलजन्मता छातीवर कोळया सारखे निशान अशा वर्णनाची व्यक्ती आढळुन आल्यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे संपर्क साधुन  हरवलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी. असे आवाहन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर मार्फत करण्यात येत आहे.

०००००००

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धा


 स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धा

Ø 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 01: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2024 करिता शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठविण्यात येणार आहे.

1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरवींद्र नाट्यमंदिर इमारतदुसरा मजलासयानी मार्गप्रभादेवीमुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘what’s new’ या सदरात ‘late yashwantrao chavan state literature award 2024 rules book and application form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णता भरून आवश्यक साहित्यासह सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात.

 लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दि. 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पाठवावे. लेखक/प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठवितांना सदर बंद लिफाफ्यावर/ पाकिटांवर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार-2024 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीतअसे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले.

0000000

पुनर्वसित मौजा नवीन रानतळोधी हे गाव महसुली गाव म्हणून घोषित


 पुनर्वसित मौजा नवीन रानतळोधी हे गाव महसुली गाव म्हणून घोषित

चंद्रपूरदि. 01: महसूल व वन विभागाची शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वयेकार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील रानतळोधी गावातील संपुर्ण कुटुंबाचे पुनर्वसन होईपर्यंत सदर गाव महसुली गाव कायम ठेवून वरोरा तालुक्यातील नवीन रानतळोधी हे महसूली गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी अंतिम अधिसूचना काढली आहे.

त्याद्वारेदि. 23 डिसेंबर 2024 पासून चंद्रपूर जिल्ह्याच्यावरोरा तालुक्यातील नवीन रानतळोधी हे महसूली गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. यापुढे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात 163 गावे असुन त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच वरोरा तालुक्यामधील 185 गावांमध्ये 1 गाव वाढल्यामुळे 186 गावे होतील. क्षेत्र 374.75 हे. आर. असून उत्तरेस मौजा बांदरा गावाची शीवपुर्वेस जंगल सरकार वन कक्ष क्र. 14 अ व ब आणि रस्तादक्षिणेस मौजा खैरगाव गावाची शीव तर पश्चिमेस मौजा मजरा रै. व मौजा खैरगाव गावाची शीव सदर गावाची चतु:सीमा परिशिष्टानुसार आहे.

वरोरा तालुक्यातील मौजा नवीन रानतळोधी हे गाव महसुली गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे.

000000000

जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


 जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूरदि. 01: जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने जिल्हा समाज कल्याण कार्यालयातंर्गत जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेषशाळाकर्मशाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीनेशनिवारदि. 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजताक्रीडा स्पर्धा तर सायकांळी 5.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस मुख्यालय ग्रांउडचंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

तरीसर्व नागरिकांनी सदर स्पर्धा व कार्यक्रमाला उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.

000000000