जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 01: जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने जिल्हा समाज कल्याण कार्यालयातंर्गत जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेषशाळा, कर्मशाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने, शनिवार, दि. 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता, क्रीडा स्पर्धा तर सायकांळी 5.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस मुख्यालय ग्रांउड, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
तरी, सर्व नागरिकांनी सदर स्पर्धा व कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.
000000000
No comments:
Post a Comment