Search This Blog

Wednesday, 29 January 2025

बल्लारपूर येथील आस्थापनेवर संयुक्त कारवाई

 

बल्लारपूर येथील आस्थापनेवर संयुक्त कारवाई

Ø बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान

चंद्रपूरदि. 29 : नागपूरचे अपर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांच्या निर्देशानुसार व चंद्रपूरचे सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनात बाल व किशोरवयीन कामगार (नियमन व निर्मूलन अधिनियम 1986) व सुधारित अधिनियम2016 अंतर्गत बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान राबविण्यात आले.

या अभियानादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकाजवळील धनलक्ष्मी साउथ इंडियन कॅफे येथे एक बालकामगार आढळून आल्याने पोलीस स्टेशनबल्लारपूर येथे एफ.आय.आर दाखल करण्यात आली असून आस्थापना मालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 

सदर कारवाई दुकान निरीक्षक सचिन अरबट यांच्या नेतृत्वात सिद्धेश्वर फडमहिला बालकल्याण विभागाच्या दिपाली मेश्रामचाइल्ड लाईनचे दीपक मेश्रामविशाल शेळकेउपपोलीस निरीक्षक मीनल कापगते यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करण्यात आली.

काही दुकान मालक लहान मुलांना आपल्या आस्थापनेवर काम करण्यास ठेवतात व त्यांचे शोषण करतात. असे करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. समाजातील प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून बालकांकडून काम करून घेत असल्याचे आढळून आल्यास कामगार आयुक्त कार्यालय अथवा 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment