1 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन
Ø पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची असणार उपस्थिती
चंद्रपूर, दि. 31 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-2010 अंतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने, चंद्रपूर ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन दि. 1 व 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर ग्रंथोत्सवाला आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची उपस्थिती असणार आहे.
ग्रंथोत्सवाचा शुभारंभ शनिवार, दि.1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या आयोजनानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध साहित्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये दुपारी 3 वाजता अभिजात मराठी भाषा व तिचे भवितव्य, तर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता समाज माध्यमांचा वाढता प्रभाव व ग्रंथालयांची उपयोगिता या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 2 ते 4 वाजता मराठी गझल मुशायरा सादर होणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment