Search This Blog

Saturday, 25 January 2025

सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक - जिल्हाधिकारी विनय गौडा





 

सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक -      जिल्हाधिकारी विनय गौडा  

चंद्रपूरदि. 25 : निवडणूक हा लोकशाहीचा पाया असून मतदान करणे हा आपला सर्वोच्च अधिकार व कर्तव्य आहे.  लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विकासाला चालना व गती प्राप्त होते. त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे गरजेचे आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक असल्याचे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.

नियोजन भवन येथे 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संजय पवारउपजिल्हाधिकारी अतुल जटाळेउपविभागीय अधिकारी संजय पवारउपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरीजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकरतहसिलदार विजय पवारमतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच नवमतदारांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेदेशाच्या लोकशाहीचा केंद्रबिंदू असणाऱ्या मतदारांसाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांनी जागृत राहून मतदान करावे. जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठीलोकशाही आणि देश पुढे नेण्यासाठी प्रत्येक मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. आता नवमतदारांना वर्षातून चार वेळा ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे आणि लोकशाहीतील आपला सर्वात महत्वाचा असा मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी केले.

प्रास्ताविकेत बोलतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी म्हणाले25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. सन 2011 पासून संपुर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदार विशेषत: युवा मतदारामध्ये मतदानाबाबत जनजागृती करणेमतदार यादीत नाव नोंदविण्याकरीता प्रोत्साहित करणेत्यांची नाव नोंदणी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मतदार दिवसाची थीम Nothing like voting, I vote for sure अशी आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. चौधरी म्हणाले.

तत्पुर्वीजिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सपना पिंपळकर तर आभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांनी मानले.

  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षक व बीएलओंचा सत्कार :

2024 निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्र पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व उपस्थित करण्यात आला. यामध्येपर्यवेक्षक पंचशिला भोयरमनोज पुलगमकरनरेश गेडामरतिराम चौधरीनंदकिशोर वर्धलवारअजय निखाडे तर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी प्रदीप पायघनप्रकाश राठोडसुनिता अडबाले,संकेत जयकरप्रशांत गटलेवारकृष्णमाला मडावीरुपेश टिकलेविरेंद्र सुखदेवेसंध्या बोकारेनिरंजन शास्त्रकारअनिल वाघमारेज्योती आसनपल्लीवार आदींचा समावेश होता.

००००००


No comments:

Post a Comment