Search This Blog

Friday, 17 January 2025

20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन

 

20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन

चंद्रपूरदि. 17 : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर व चवथ्या सोमवारी तालुका स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जानेवारी महिन्याचा तिसरा सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी असल्यामुळे या दिवशी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला लोकशाही दिनी न्यायप्रविष्ठ प्रकरणेसेवाविषयकआस्थापना बाबी विषयक व विहित अर्जात नसलेली प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपात असेलअशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी जिल्हा महिला व बालविकास अधिकारीचंद्रपूर यांच्या कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास प्राप्त तक्रार संबंधित विभागाला पाठवून अर्जाचा निपटारा करण्यात येईलअसे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment