कला कौशल्यातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास - जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन
चंद्रपूर दि. 04 : जय आणि पराजय या गोष्टीची परवा न करता मुलांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहे. त्यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ तथा कला कौशल्य जोपासू द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव 2024 - 25 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, बाल न्यायालय मंडळाच्या पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष सीमा लाडसे, नगर पालिका प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲङ क्षमा बारसकर, पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रफी अहमद किडवई स्कूलद्वारे स्काऊट गाईड परेड आणि मशाल पेटवून करण्यात आली. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, बालकामगार, बालविवाह, बालशोषण प्रतिबंधावर यावेळी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
प्रस्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत म्हणाले, विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक व कौशल्यात्मक विकास व्हावा तसेच बालगृहातील मुलांना बाहेर जगातील स्पर्धांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण व्हावे, यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रेसलिंग स्पर्धेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या प्रिती बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राणी खडसे यांनी तर आभार जिल्हा परिक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी मानले.
000000
No comments:
Post a Comment