Search This Blog

Sunday, 12 January 2025

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

14 ते 26 जानेवारी कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 12:  शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शासनाने 29 डिसेंबर 2023 व 25 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसारशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली विहीत केलेली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षीच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शकखेळाडूदिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडूव्यक्ती यांचेद्वारा दि. 14  ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कारक्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकजिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार( महिला क्रीडा मार्गदर्शक),  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडूसाहसी उपक्रमदिव्यांग खेळाडू आणि महिला क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शकखेळाडूसाहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंकमध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. 14  ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment