आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स कॅम्पचे आयोजन
चंद्रपूर, दि.09 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंटनुसार देण्यात येणार आहेत.
या ठिकाणी होणार शिबीर : 27 जानेवारी 2025 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 28 जानेवारी रोजी एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 29 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर, 30 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी तर 31 जानेवारी 2025 रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर या ठिकाणी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील दिलेल्या शिबिराचे ऑनलाईन अपॉईंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल, याची नोंद चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment