Search This Blog

Tuesday, 14 January 2025

16 जानेवारी रोजी राज्यपाल चंद्रपुरात

 

16 जानेवारी रोजी राज्यपाल चंद्रपुरात   

चंद्रपूर दि. 14 : चंद्रपूर येथे 16 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन 16 जानेवारी रोजी चंद्रपुरात येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

16 जानेवारी रोजी दुपारी 2.35 वाजता मोरवा विमानतळ येथे आगमन, दुपारी 3 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज या कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 4.15 वाजता मोरवा विमानतळाकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment