हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 01: चंद्रपूर शहरातील कोतवाली वार्ड येथील रहिवासी मनिंद्र गणेश यादव हा व्यक्ती काही न सांगता घरुन निघुन गेला. सदर व्यक्तीचा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, वार्डामध्ये तसेच नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता आढळून आला नाही.
हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे:
मजबुत बांधा, उंची 5 फुट 10 इंच, रंग सावळा, केस बारीक, चष्मा मोठया भिंगाचा, चेहरा गोल, अंगात क्रिम कलरचे शर्ट, निळया रंगाचा फुल पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, जन्मता छातीवर कोळया सारखे निशान अशा वर्णनाची व्यक्ती आढळुन आल्यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे संपर्क साधुन हरवलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी. असे आवाहन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर मार्फत करण्यात येत आहे.
०००००००
No comments:
Post a Comment