महिलांना आता घरून करता येईल हस्तकला व्यवसाय
Ø नांदगाव पोडे येथे प्रशिक्षणाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 08 : खाणबाधित क्षेत्रातील कारागिरांची कार्य कुशलता वाढविण्यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली च्या वतीने नांदगाव पोडे येथे बांबू हस्तकला प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. खनिज विकास निधीच्या माध्यमातून महिलांना स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्याकरिता तसेच आर्थिक मिळकतीत सक्षम होण्यासाठी घरी राहून काम करता यावे, यासाठी नांदगाव पोडे येथील महिलांना बांबु हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणादरम्यान बांबूपासून विविध प्रकारच्या जाळी विणकाम शिकविण्यात आले. जाळीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे, जसे टोपली, बॉक्स, बांबुची फुले इत्यादी कलाकृती शिकविण्यात आल्या. प्रशिक्षणाचे आयोजन बांबु संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी. मल्लेलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक प्रशिक्षण समन्वयक योगिता साठवणे तसेच हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड, संतोष बजाईत, मनिषा शर्मा या प्रशिक्षकांच्या देखरेखीत 13 महिलांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
सदर प्रशिक्षणात नांदगाव पोडे येथील सरपंच श्रीमती वैद्य यांनी भेट दिली आणि महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू बाबत महिलांचे अभिनंदन केले तसेच सदर प्रशिक्षण कार्यक्रम नांदगाव पोडे येथे आयोजित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
०००००
No comments:
Post a Comment