कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण विषयावर कार्यशाळा
चंद्रपूर दि. 30 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण विषयावर जिल्ह्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालकल्याण समितीच्या सदस्या वनीता घुमे, सत्यार्थ फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक रवि आडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर, सदस्या डॉ. ज्योत्सना मोहितकर, बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना रवि आडे यांनी, कायद्यात असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तरतुदी, महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी साधावयाचा समन्वय, त्यांच्या आचरणात असणारा शब्दप्रयोग, तक्रार झाल्यानंतर तक्रारीचा निपटारा कशाप्रकारे करायचा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अंतर्गत तक्रार समित्या किंवा जिल्हा तक्रार समितीकडे आलेल्या लेखी तक्रारीवर समित्यांची कार्य करण्याच्या पद्धती, त्यांचा असलेला निष्पक्षपाती दृष्टीकोन यासंपुर्ण घडामोडी व अधिनियमांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत मोकाशे तर आभार समुपदेशक यशवंत बावनकर यांनी मानले.
००००००
No comments:
Post a Comment