Search This Blog

Wednesday, 29 January 2025

100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’




 

100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’

Ø कळमना येथे पाहणी व शेतक-यांना मार्गदर्शन

चंद्रपूरदि. 29 : सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच          अधिका-यांनासुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत कळमना (ता. राजुरा) येथे भेट देऊन पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.  

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी कळमना येथील ॲग्री स्टॅक शिबिरास भेट देऊन शेतकरी बांधवांना ॲग्रीस्टॅक योजनेचे महत्त्व सांगितले. तसेच सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावे. संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारीसीएससी सेंटरमहाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत फार्मर आयडी तयार करून मिळेल. याकरिता आधार कार्ड व आधार संलग्न मोबाईल क्रमांकसह शेतकरी बांधवांनी त्वरीत फार्मर आयडी तयार करून घ्यावा. शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतक-यांने घेतलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्जवितरण सुलभता व कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.

सौरग्राम योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवावे. त्यामुळे वीज निर्मिती होईल व वीज बील शुन्य येईल. गटविकास अधिका-यांनी याबाबत गावातील कुटुंबाचा प्रस्ताव तयार करावा. याकरीता निधी कमी पडला तर जिल्हास्तरावरून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. याकरिता

महाराष्ट्र शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांसाठी 100 दिवसाचा कृती आराखडा अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी कळमना येथे ऑक्सिजन पार्क, भूमिगत ड्रेनेज सिस्टीम व सुंदर माझी शाळा या ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

पाहणी दौरा दरम्यान राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, ग्रामपंचायतीचे सरपंचउपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, गट शिक्षणाधिकारीग्राम महसूल अधिकारीग्राम विकास अधिकारी इत्यादी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment