Search This Blog

Monday, 20 January 2025

एकलव्य रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारी रोजी प्रवेशपूर्व परीक्षा


एकलव्य रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी 23 फेब्रुवारी रोजी प्रवेशपूर्व परीक्षा

Ø पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

            चंद्रपूरदि. 20: राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलदेवाडा (ता. राजुरा) येथे प्रवेश पुर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

            या परीक्षेद्वारे इयत्ता 6 वीत 2220 नवीन तर इयत्ता 7 वी ते 9 वीच्या 1049 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर कार्यालयात अर्ज सादर करावा.

            दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नागपूर कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र ट्रायबल पब्लीक स्कुल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्डाच्या 10 एकलव्य निवासी शाळा चालवल्या जातात. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणनिवासभोजनगणवेश आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

            सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 7 वी ते 9 वी करिता रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. तर प्रत्येक एकलव्य स्कुलमध्ये इयत्ता 6 वी साठी 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता असणार आहे. या सर्व जागांवर प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या इयत्ता 6 वीच्या 60 जागांवर विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेशपूर्व परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. त्यात मुलांच्या 30 जागा तर मुलींच्या 30 जागांचा समावेश आहे. इयत्ता 7वी, 8वी व 9 वीच्या रिक्त जागा प्रवेशपूर्व परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमे व प्राधान्यक्रमानुसार होणार आहे.

             तरी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावाअसे आवाहन चंद्रपूरएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००


No comments:

Post a Comment