1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शन
Ø पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Ø दोनशेपेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता समुह होणार सहभागी
चंद्रपूर दि. 30 : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीकरीता 1 ते 5 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व मिनी सरस प्रदर्शनी-2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनीचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आदिवासी विकास विभाग तथा पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे हस्ते पार पडणार आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता समुह सहभागी होणार आहे. दि. 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान रोज सांयकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
स्वयंसहाय्यता समुहांकडून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणाच्या दृष्टीने वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या कौशल्याचे प्रदर्शन व स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठीचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये असलेल्या व्यावसायिक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.
चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनीस भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
विविध गृहपयोगी उत्पादने असणार विक्रीस उपलब्ध : प्रदर्शनीमध्ये सहभागी गटाच्या माध्यमातून विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांबपोळी, पुरणपोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तु, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ, कापडी बॅग, टेराकोटा, गांडूळखत आदींचा समावेश आहे. या सोबतच स्वंयसहाय्यता समूहांचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असणार आहेत. यात पुरणपोळी, शाकाहारी तसेच मांसाहारी जेवण, झुणका भाकर, लांब पोळया आदीचा समावेश आहे.
०००००००
No comments:
Post a Comment