ओबीसी महामंडळाची एकरक्कमी व्याज परतावा योजना
चंद्रपूर, दि. 09 : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा योजना दि.31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. सर्व योजनेंतर्गत कर्ज खाते बंद करू इच्छिणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
त्याअनुषंगाने, महामंडळाच्या योजनेतील थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment