Search This Blog

Thursday, 9 January 2025

निवृत्तीवेतनधारकांच्या शंका व समस्यांचे निराकरण


 

निवृत्तीवेतनधारकांच्या शंका व समस्यांचे निराकरण

Ø कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

चंद्रपूरदि. 09: निवृत्तीवेतनाबाबत निवृत्ती वेतनधारकांच्या शंकासमस्या व सूचना जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी नागपूर महालेखाकार कार्यालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयात निवृत्तीवेतन धारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नागपूर महालेखाकार कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी राजेश सांगोडेसहायक लेखाधिकारी चंद्रप्रकाशजिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवारअपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) राजश्री सेलूकरसंजय पडिशालवारसंतोष फुलझेलेवरिष्ठ लेखापाल बालबिहारी प्रजापतीजिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे अध्यक्ष रमेश कासुलकर तसेच निवृत्तीवेतनधारकांची उपस्थिती होती.

वरिष्ठ लेखाधिकारी राजेश सांगोडे यांनी निवृत्तीवेतन प्रकरणासंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणीबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन केले. सहायक लेखाधिकारी श्री. चंद्रप्रकाश यांनी ई-निवृत्तीवेतन प्रदान आदेशासंबधी निवृत्तीवेतन धारकांना विस्तृत मार्गदर्शन केले. सदर मेळाव्यामध्ये उपस्थित सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या शंका व समस्यांचे निराकरण करण्यात आले.

प्रास्ताविकेत अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) राजश्री सेलूकर यांनी शासनाने सुरु केलेल्या नवीन इलेक्ट्रॉनिक पेंशन पेमेंट आदेशाबाबत उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रश्मी कहुरके तर आभार तानाजी पवार यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment