Search This Blog

Wednesday, 29 January 2025

चंद्रपूर तहसील कार्यालयात मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन


 चंद्रपूर तहसील कार्यालयात मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन

चंद्रपूर, दि. 29 : राज्य शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत येत्या 100 दिवसांत प्राधान्याने ‘ईज ऑफ लिव्हींग’ निर्देशित, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण होण्याचे दृष्टीने चंद्रपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयव तहसील कार्यालय येथे नागरिकांना कार्यालयीन कामकाजाकरीता मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नागरिकांना कार्यालयीन कामकाजाबाबत अडचणी असल्यास तक्रार नोंदविण्याकरीता 24 × 7 व्हॉट्सॲप क्र. 8530811366 कार्यान्वित करण्यात आला असून त्यावर नागरिक कार्यालयीन कामाकाजासंबंधी तक्रारीचा अर्ज पाठवू शकतात. सदर तक्रार अर्जाची त्वरीत दखल घेण्याबाबत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयतसेच तहसील कार्यालय येथील कार्यालयीन कामकाजाबाबत सामान्य नागरिकांना कुठल्याही बाबतीत मदत हवी असल्यास मदत व तक्रार निवारण कक्षामध्ये संपर्क साधावा. सदर कक्ष (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील, असे तहसीलदार विजय पवार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment