शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
चंद्रपूर, दि. 17 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या, चंद्रपूर शाखा कार्यालयामार्फत रोजगार व स्वयंरोजगार करण्याच्या मूळ उद्देशाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील वय 18 ते 45 दरम्यान असणारे स्त्री-पुरुष व बचत गटांना दीर्घ मुदतीवर अल्प व्याजदराने कर्जाचे वितरण केल्या जाते. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडे सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नवी दिल्ली (NSTFDC) पुरस्कृत मुदत कर्ज योजनेचे लक्षांक/ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. लक्षांक मर्यादित वेळेत पूर्ण करावयाचा असल्याने जिल्ह्यातील स्त्री-पुरुष व बचत गटांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
महिला सबलीकरण योजना, कृषी आणि संलग्न व्यवसाय तसेच लहान उद्योग धंद्यांकरिता रुपये 2 लक्ष, लघुउद्योग व्यवसाय तसेच ऑटो रिक्षा/मालवाहू रिक्षाकरिता 3 लक्ष, वाहन व्यवसायाकरिता (प्रवासी किंवा मालवाहू) 10 लक्ष, हॉटेल/ढाबा, ऑटो वर्कशॉप/स्पेअर पार्ट/गॅरेज आदी व्यवसायाकरिता रुपये 5 लक्ष कर्ज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरिता 54 लक्षांक प्राप्त असून जिल्ह्यातील स्त्री-पुरुष व बचत गटांनी अर्ज करावे, असे आवाहन शाखा व्यवस्थापक आर. एस. भदाणे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment