Search This Blog

Tuesday, 7 January 2025

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

चंद्रपूर, दि. 07 :  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संघलोक सेवा आयोग (युपीएससी) या परीक्षेची  पूर्व तयारी करून  घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे  20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत सीडीएस कोर्स आयोजित  करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

 तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी  उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune (DSW) यांच्या वेबसाईट  www.mahasainik.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६४) कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व पशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी ) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment