जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप
चंद्रपूर, दि. 06 : जिल्ह्यातील शासकीय तथा
निमशासकीय बालगृहातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा तसेच इतर मुलांसोबत
स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या
चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप नुकताच करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव
2 ते 4 जानेवारी या कालावधीत घेण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहदिवाणी
न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रशांत कुळकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी सीमा
लाडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष यादव आदी उपस्थित होते.
यावेळी न्या. प्रशांत कुळकर्णी म्हणाले, स्पर्धांमधूनच
यशस्वी व्यक्तिमत्व घडत असते. स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा.
त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण विकसीत होतात, असे त्यांनी सांगितले. सुमित जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
व भविष्यासाठी शुभेच्छा.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी दीपक बानाईत म्हणाले, पोलिस फुटबॉल मैदान येथे रंगलेल्या तीन दिवसीय बाल
महोत्सवात कबड्डी,
खो-खो, गोळा फेक,
धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ,
निबंध, वक्तृत्व,
वादविवाद, नृत्य, गायन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या
होत्या. या स्पर्धांमधील विजेते, नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील चाचा
नेहरू बाल महोत्सव 2024-25 स्पर्धेकरीता पात्र
ठरले आहेत.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प समन्वयक
अभिषेक मोहुर्ले यांनी तर आभार जिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे यांनी
मानले. कार्यक्रमाला पोलिस उपअधिक्षक निशिकांत
रामटेके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गडचिरोली प्रकाश
भांददकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर,
अॅड. अमृता वाघ,
ज्योत्स्ना मोहितकर, वनिता
घुमे, अॅड. मनिषा नखाते,
भावना देशमुख, अॅड. अमृता
वाघ, मोरेश्वर झोडे,
हेमंत सवई, दिवाकर महाकाळकर अतिशकुमार चव्हाण, कविता राठोड, अनिल ताणले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांच्यासह जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन तथा रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, सखी वन स्टॉप सेंटर, शक्तिसदन किलबिल दत्तक संस्था, स्वामी विवेकानंद बालगृह राजुरा, स्वामी विवेकानंद बालगृह नागभीड आदी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment