मृतक अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 24 : एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष हा रेल्वे स्टेशन, चंद्रपूर डाऊन लाईन एन्ड, होम सिग्नल येथे मृत अवस्थेत आढळून आला. सदर मृतक व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात येत आहे.
मृतक व्यक्तीचे वर्णन : उंची 6 फुट, रंग गोरा, काळे केस वाढलेले, दाढी मिशी बारीक, सडपातळ बांधा, चेहरा लांबट, निळया रंगाचे पांढरे, बारीक फुल बायाचे शर्ट व काळया रंगाचा जीन्स पॅन्ट परीधान केलेला आहे. तरी, सदर वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती उपलब्ध असल्यास रेल्वे पोलीस स्टेशन, वर्धा येथील 7499967957, 9823426495 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे वर्धा रेल्वे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment