नझूल भुखंडधारकांनी अभय योजना विशेष शिबिराचा लाभ घ्यावा
Ø 21 व 22 जानेवारी रोजी शिबीराचे आयोजन
चंद्रपूर, दि. 17 : निवासी प्रयोजनार्थ, भाडेतत्वावर दिलेल्या नझूल जमिनीबाबत शासनाच्या वतीने ‘विशेष अभय योजना 2024-25’ राबविण्यात येत आहे. नझूल भुखंडधारकातील सत्ताप्रकार ‘ब’ मधून ‘अ’ व लिज नुतनीकरण करण्यासाठी चंद्रपूर तहसिल कार्यालयामार्फत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीर दि. 21 व 22 जानेवारी 2025 रोजी झोन क्र. 1 मधील संजय गांधी मार्केट, सिव्हील लाईन, चंद्रपूर, झोन क्र.2 मधील चंद्रपूर शहर महानगरपालिका(सात मजली इमारत), आणि झोन क्र.3 मधील बंगाली कॅम्प, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर या ठिकाणी शिबीर पार पडणार आहे. या शिबिरामध्ये सत्ताप्रकार ‘ब’ धारणाधिकार असलेले नझूल भुखंडधारक यांना लागणारी कागदपत्रे व धारणाधिकार बदलण्याची प्रक्रिया याबद्दल अभय योजना 2024-25 अतंर्गत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी, सर्व नझूल भुखंडधारकांनी अभय योजना विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
०००००००
No comments:
Post a Comment