कारागृहातील 658 बंद्यांची क्षयरोग आरोग्य तपासणी
Ø विशेष शिबिराचे आयोजन
चंद्रपूर, दि. 31 : जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे क्षयरोग आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात 658 बंदी बांधवांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. शिबिरात 167 बंदी बांधवांचे छातीचे क्ष-किरण करण्यात आले असून 20 संशयीत बंदीवानांचे थुंकीचे नमूने घेण्यात आले.
नागपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निमगडे म्हणाले, दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला किंवा ताप, वजन कमी होणे, थुंकीवाटे रक्त पडणे, छातीमध्ये दुखणे तसेच 60 वर्षावरील मधुमेही, एच.आय.व्ही बाधीत, धुम्रपान करणारे, क्षयरुग्णाचे सहवासीत व्यक्ती, किडणीचे आजार अशा व्यक्तीना कोणत्याही कालावधीचा खोकला असल्यास आपल्या आरोग्याची तपासणी शासकीय दवाखान्यामध्ये मोफत करून घ्यावी, असे आवाहन केले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले यांनी समाजातील व्यक्तींनी निक्षयमित्र बनून उपचारावर असलेल्या क्षयरुग्णांना 6 महिन्याकरीता दत्तक घ्यावे व पोषण आहार किट देऊन क्षयरोग मुक्त भारत करण्याकरीता सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी नागपूरचे आरोग्य सहाय्यक श्री. तांदुळकर, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक हेमंत महाजन, सचीन हस्ते, टीबी हेल्थ विजीटर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment