आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
Ø 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 24 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) आणि महानगरपालिका शाळेमध्ये (स्वयंअर्थसहाय्यीत) आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 185 पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या 185 शाळांतील 1527 रिक्त जागांकरीता ऑनलाईन अर्ज 27 जानेवारी 2025 पर्यंत मागविण्यात येत आहे.
इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.
पालकांनी ऑनलाईन अर्ज भरतांना घरचा पत्ता, जन्मदिनांक, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदी अचूक माहिती भरावी. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अतंर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापुर्वी प्रवेश मिळालेल्या बालकाची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment