राजोली चक गावाचा समावेश बोथली साझामध्ये करण्याबाबत प्रारूप अधिसुचना जाहीर
Ø हरकती किंवा सुचना असल्यास 17 जानेवारीपर्यंत आमंत्रित
चंद्रपूर, दि. 08 : सावली तालुक्यातील मौजा राजोली चक हे महसुली गाव चक विरखल या साझातून कमी करून पुर्ववत बोथली या साज्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रारुप अधिसुचना तयार करण्यात आली आहे. याबाबत कोणत्याही नागरिकांना हरकती व सुचना असल्यास त्यांनी 17 जानेवारी 2025 पर्यंत सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
दि. 1 फेब्रुवारी 2023 च्या चिचबोडीचे सरपंच (ता. सावली) यांनी, मौजा राजोली चक हे गाव नव्याने अंतभुत झालेल्या चक विरखल या साझाच्या मुख्यालयापासून 15 कि.मी. दूर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामासाठी ये-जा करीता दळणवळणाची साधने उपलब्ध नाही. तसेच रस्त्यात घनदाट जंगल असून वाघांची भीती असल्यामुळे मौजा राजोली चक हे महसुली गाव चक विरखल या साझाऐवजी राजोली चक पासून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या बोथली या साझामध्ये अंतर्भुत करण्याबाबत निवेदन सादर केले होते.
प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सावलीचे तहसीलदार यांनी सादर केलेल्या मौका चौकशी अहवालाप्रमाणे, मौजा राजोली चक येथील ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाच्या दृष्टीने 2 कि.मी. दूर असलेला बोथली हा साझा सोयीचे असल्याचे कळविले आहे.
त्यानुसार जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 4, पोट कलम (2) नुसार तलाठी साजा निर्मिती किंवा फेरबदल करण्याचा अधिकारी जिल्हाधिकारी यांना आहे. तसेच अधिनियमाच्या कलम 4, पोट कलम (4) अन्वये अंतिम अधिसुचना प्रसिध्द करण्यापूर्वी प्रारुप अधिसुचना प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 4, पोट कलम (2) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तलाठी साझा पुनर्रचनाबाबत दि. 10 नोव्हेंबर 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात बदल करून अनुसूचीप्रमाणे मौजा राजोली चक हक महसुली गाव चक विरखल या तलाठी साझामधून कमी करून बोथली या साझाला पुर्ववत जोडण्याबाबत प्रारुप अधिसुचना जाहीर केली आहे.
पुनर्रचनेनंतर अशी राहतील बोथली साझातील समाविष्ट गावे : बोथली, पिरंजीमाल, हिरापूर, केशरवाही आणि राजोली चक.
००००००
No comments:
Post a Comment