जी.डी.सी. ॲन्ड ए. ची परीक्षा 23,24 आणि 25 मे रोजी
Ø अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 फेब्रुवारी पर्यंत
चंद्रपूर, दि. 14 : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा दिनांक 23,24 आणि 25 मे 2025 रोजी घेण्यात येणार असून अर्ज भरण्याची मुदत 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. चलनाने बॅंकेमध्ये शुल्क भरावयाची मुदत दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत आहे.
परिक्षार्थींकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. परिक्षार्थींसाठी ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.
परीक्षेकरिता लागणारी आवश्यक अर्हता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे अर्जासाठी तपशील परीक्षा शुल्क, परीक्षेच्या अटी व नियम, सुट, अभ्यासक्रम व इतर तपशिलासाठी सविस्तर अधिसुचना https:sahakarayukta.
No comments:
Post a Comment