पुनर्वसित मौजा नवीन रानतळोधी हे गाव महसुली गाव म्हणून घोषित
चंद्रपूर, दि. 01: महसूल व वन विभागाची शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये, कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील रानतळोधी गावातील संपुर्ण कुटुंबाचे पुनर्वसन होईपर्यंत सदर गाव महसुली गाव कायम ठेवून वरोरा तालुक्यातील नवीन रानतळोधी हे महसूली गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी अंतिम अधिसूचना काढली आहे.
त्याद्वारे, दि. 23 डिसेंबर 2024 पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या, वरोरा तालुक्यातील नवीन रानतळोधी हे महसूली गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. यापुढे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात 163 गावे असुन त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच वरोरा तालुक्यामधील 185 गावांमध्ये 1 गाव वाढल्यामुळे 186 गावे होतील. क्षेत्र 374.75 हे. आर. असून उत्तरेस मौजा बांदरा गावाची शीव, पुर्वेस जंगल सरकार वन कक्ष क्र. 14 अ व ब आणि रस्ता, दक्षिणेस मौजा खैरगाव गावाची शीव तर पश्चिमेस मौजा मजरा रै. व मौजा खैरगाव गावाची शीव सदर गावाची चतु:सीमा परिशिष्टानुसार आहे.
वरोरा तालुक्यातील मौजा नवीन रानतळोधी हे गाव महसुली गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे.
000000000
No comments:
Post a Comment