जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित
Ø 15 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 01: जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, दरवर्षी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिले जातात.
त्याअनुषंगाने, सन 2024-25 करिता जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. क्र. 9423673232) यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्ज 15 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्विकारले जाणार नाही.
अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात 10 वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे. अर्जदाराने वयाची 35 वर्ष पुर्ण केलेले असावे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत खेळांमध्ये प्रतिनिधीत्व केलेले असावे.
अर्ज करतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दि. 14 डिसेंबर 2022 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. सर्व पुरस्कारांमध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु. 10 हजार या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या युवकांना दि. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment