Search This Blog

Monday, 30 March 2020

जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या प्रवाशांबाबत जिल्हा प्रशासनाची विशेष खबरदारी

चंद्रपूर, दि.29 मार्च : महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना (कोविड-19) या आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचे रुग्ण सर्वच विभागांमध्ये आढळून आले आहेत. कोरोना (कोविड-19) नियंत्रणाचा एक भाग म्हणून राज्यामध्ये संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. तथापिमहाराष्ट्रातील तसेच काही कारणामुळे परराज्यात गेलेले प्रवासीस्थलांतरित कामगारबेघरइ. राज्यामध्ये परत येत आहेत. त्यातील बरेचसे पायी व मिळेल त्या रस्त्याने येत आहेत. या प्रवाशांकडून  कोरोना(कोविड-19) चा प्रसार होऊ शकतोही बाब लक्षात घेता विशेष खबरदारी साठी  महाराष्ट्र शासनाने सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रक काढून याविषयीच्या कार्यवाही संदर्भात सूचना दिल्या आहेत.
अशी असणार आहे कार्यवाही:
राज्यांतील जिल्ह्याच्या सीमेवर किंवा राज्याच्या सीमा भागातील जिल्ह्यांमध्ये जे प्रवासीस्थलांतरित कामगारइ. येतील त्यांना वर नमूद केल्यानुसार आहे.त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलगीकरण (क्वॉरेन्टाईन) मध्ये ठेवण्यात यावे. त्या ठिकाणी त्यांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
परराज्यातून आलेले प्रवासीस्थलांतरित कामगार व बेघर यांना महसुल विभागाने दिलेल्या वास्तव्याच्या ठिकाणी आणल्यानंतर तेथून जवळ असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सुचना संबंधितांना द्याव्यात.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करावे. गरोदर माता,बालके यांची विशेष काळजी घ्यावी.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना कोरोना(कोविड-19)आजार व या आजाराच्या प्रतिबंधासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर आरोग्य शिक्षण द्यावे.
प्रवाशांमध्ये ताप (100 च्या पुढे)खोकला-धाप लागणे अशी लक्षण असणारे प्रवाशी असल्यास पुढील तपासणीसाठी त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करावे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये संशयित कोरोना (कोविड-19) कक्षामध्ये या सर्वांना दाखल करावे आणि त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घ्यावा. चाचणी अहवाल समारात्मक आल्यास त्वरित आयसोलशन कक्षात दाखल करावे. अहवाल नकारात्मक आल्यास महसुल विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पुढील कार्यवाही करावी.
रुग्णांची चाचणी सकारात्मक आल्यास त्यांच्या सहवासितांची संपूर्ण माहिती घ्यावी व त्यांना स्वतंत्रपणे 14 दिवसांसाठी क्वॉरेन्टाईन मध्ये ठेवावे व लक्षणे आढळून आल्यास पुढील कार्यवाही करावी.
500 पेक्षा जास्त प्रवासी एका ठिकाण असतील तर,तेथे बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) यांना 24 तास उपलब्ध ठेवण्यात यावे.
प्रवासीस्थलांतरीत कामगार आणि बेघर यांचेमुळे स्थानिक जनतेमध्ये कोरोना (कोविड-19) आजार पसरु नये यासाठी उपरोक्त नुसार जिल्हा प्रशासन कार्यवाही करणार आहे.
00000

प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

चंद्रपूरदि. 29 मार्च : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 तसेच कलम 144 व संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रशासन वेळोवेळी सूचना व आदेश काढत आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
या असणार कारवाईच्या कलम व शिक्षा:
आदेशाची अवज्ञा केली तर भा.द.वि  कलम 188 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 1 महिना कैद व 100 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा तसेच जर आदेशाची अवज्ञा झाल्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले तर 6 महिने कैद व 1 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
संसर्ग पसरायची हयगयीची कृती आढळून आल्यास भा.द.वि  कलम 269 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 6 महिने कैददंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाईलघातक कृती (रोग पसरवू शकतो) अशी कृती केल्यास भा.द.वि  कलम 270 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 2 वर्ष कैददंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून दळणवळणाची साधने याबाबत शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे असे आढळून आल्यास भा.द.वि  कलम 271 नुसार अदखलपात्र,जामीनपात्र 6 महिने कैददंड किंवा दोन्हीही शिक्षा केल्या जाईलसार्वजनिक उपद्रव केल्यास भा.द.वि  कलम 290 ‌ नुसार दखलपात्र,जामीनपात्र 200 रुपये पर्यंत दंडाची शिक्षा केल्या जाईल तसेच अफवा पसरविली तर भा.द.वि  कलम 505(2) नुसार दखलपात्र,अजामीनपात्र 3 वर्ष कैददंड किंवा दोन्हीही शिक्षा केल्या जाईल.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वयेदिलेले आदेश न पाळणे उदा. दुकान पानटपरीहॉटेलआस्थापना उघडे ठेवल्यास कलम 51 ब नुसार दखलपात्र,जामीनपात्र 1 वर्ष कैद,दंड किंवा दोन्हीही शिक्षा होवु शकतात तसेच जर वरील उल्लंघनामुळे मानवी जिवित हानी झाल्यास 2 वर्ष कैद,दंड किंवा दोन्हीही केल्या जाईल,चुकीची अफवा पसरविल्यास कलम 52 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 2 वर्ष कैद,दंड या शिक्षा केल्या जाईल,जनतेमध्ये भिती निर्माण होईल अशी अफवा पसरविल्याबद्दल दखलपात्र,जामीनपात्र कलम 54 नुसार 1 वर्ष कैद,दंड या शिक्षा होवु शकतात.
महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये जमावबंदी आदेश उल्लंघन केल्यास कलम 37(3) व कलम 135 नुसार दखलपात्र,जामीनपात्र 4 महीने कैद आणि दंड,1 महिना कैद आणि दंड या शिक्षा केल्या जातील.
साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अन्वये जे जे अत्यावश्यक व योग्य आहे ते करण्याचे आदेश न पाळणे यासाठी कलम 2,3,4 नुसार कलम 188 प्रमाणे शिक्षा केल्या जाईल.
अनावश्यकपणे बाहेर फिरणारे व वाहनांवर अनावश्यकपणे कोणतीही गरज नसतांना फिरुन आदेशाचे उल्लंघन करणारे व त्यांचे वाहन देखील पोलिस ठराविक कार्यमर्यादेसाठी ताब्यात घेऊ शकतात.
आपत्ती व्यवस्थापन कायदाकलम 30 प्रमाणे आपत्ती निवारण होने करीता आवश्यक असणारे जे उपाय करणे शक्य आहे ते करणेकरिता जिल्हास्तरावरील समितीचे अधिकार आहे. कलम 33 अन्वये इतर अधिकारी किंवा आस्थापणा यांना आदेश देण्याचे अधिकार जिल्हा स्तरावरील समितीस आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 संबंधाने सक्षम प्राधिकरणाने मनाई आदेश केलेले असणे आवश्यक आहे.
00000

मोफत धान्य वाटपाबाबत जनतेमध्ये कोणीही संभ्रम निर्माण करू नये : राजेंद्र मिस्कीन

चंद्रपूर,दि. 29 मार्च: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही लोक गरजू व गरीब लोकांकडून आधारकार्ड गोळा करून त्यांना मोफत धान्य मिळवून देण्याचे आमिष दाखवत आहेत. अशा तक्रारी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातून प्राप्त होत असून बऱ्याच लोकप्रतिनिधींकडून व सामान्य जनतेकडून प्रशासनाकडे मोफत धान्याबाबत विचारणा होत आहे.
मोफत धान्य वाटपाबाबत शासनाकडून कोणतेही निर्देश आजमितीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेले नाहीत.त्यामुळे मोफत धान्य वाटपाबाबत जनतेमध्ये कोणीही संभ्रम निर्माण करू नये. तसेच जनतेने सुद्धा प्रशासनाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे मोफत धान्याबाबत चौकशी करू नये. मोफत धान्य वाटपाबाबत शासनाकडून आदेश आल्यास त्याबाबत योग्य वेळी प्रसिद्धी देऊन वाटप करण्यात येईल.
अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.
शासन आदेशानुसार जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशन कार्डधारकांना माहे एप्रिल,मे व जून 2020 या तीन महिन्यांचे धान्य वितरणाचे आदेश जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आले असून कार्डधारकांनी त्यांचेशी संबंधित दुकानातून एकाच वेळी महिन्याचे धान्याची उचल करावी. धान्य घेतेवेळी स्वस्त धान्य दुकानात गर्दी होणार नाही व व्यक्ती मध्ये मीटरचे सुरक्षित अंतर राहील याची सर्वांनी दक्षता घेण्यात यावीअसे आवाहन देखील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले आहे.
00000

संचार बंदीच्या काळात दूध पुरवठा नियमित सुरू ठेवा शालेय पोषण आहाराच्या वितरणाचे आदेश

चंद्रपूर दि. 28 मार्च : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असणाऱ्या पोषण आहाराचा पुरवठा थांबून होता. तो पूर्ववत करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. तसेच या काळात दूध हे अत्यावश्यक गरजेमध्ये मोडत असून सर्वांना मुबलक प्रमाणात ते मिळावेयासाठी सर्व डेअरी पूर्ववत सुरू करण्यात याव्यातअसे आदेशही देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.संचारबंदी च्या कालावधीत दुधाचा सुरळीत पुरवठा सुरू राहण्याच्या दृष्टीने दूध डेअरी पूर्ववत सुरू करण्यात यावे. दूध डेअरी मध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमितपणे कर्तव्यावर येण्या जाण्याकरिता ओळखपत्र देण्यात यावे.
तसेच, दूध डेअरी मध्ये काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव टाळण्याकरिता मास्क पुरविण्यात यावे तसेच एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक कर्मचारी एकत्रित राहून काम करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.
शालेय पोषण आहाराचा शिल्लक असलेला तांदूळ व डाळी कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण होणार :
संचारबंदी मध्ये सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व दाळीकडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याकरिता शालेय शिक्षण विभागाद्वारे निर्देश दिलेले आहे.
वितरण करताना शाळेचे मुख्याध्यापकयोजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांदूळ व डाळीकडधान्यांचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन करावेशाळा स्तरावरून वितरणासंबंधी प्रसिद्धी करण्यात यावीवितरण करताना शाळा स्तरावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थीत्यांचे पालक यांना टप्प्याटप्प्याने शाळेमध्ये बोलवुन एकमेकापासून रांगेत मीटरच्या अंतरावर उभे  करून वितरण करावे. विद्यार्थी पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे वितरण घरपोच करण्याचे नियोजन करावे.
वितरणाची नोंद शाळा स्तरावर घेण्यात यावी व वितरणा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेली आहे. अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी दिली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी यांची डिस्ट्रिक्ट इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती:
आयुक्त,चंद्रपूर शहर महानगरपालिकाचंद्रपुर यांनी त्यांचे प्रत्येक झोन करिता एक अधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांना कार्यकारी दंडाधिकारी अधिकार प्रदान करण्याचे प्रस्ताव त्वरित सादर करावा. या नियंत्रण अधिकारी यांचे अधिनस्त त्यांना मदत करण्यास वार्ड निहाय एक पथक तयार करून त्याची माहिती सुद्धा उपलब्ध करून द्यावी.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिकानगरपंचायत क्षेत्रातील मुख्याधिकारी,नगरपंचायत,नगरपरिषद हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील व त्यांनी त्यांच्या अधिनस्त प्रत्येक वार्डात पथक स्थापन करतील.मुख्याधिकारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी चे अधिकार प्रदान करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील.
सर्व तहसीलदार यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक महसूल मंडळ निहाय महसूल मंडळ अधिकारी यांचे नेतृत्वात एक पथक तयार करून व दोन महसूल मंडळ निहाय एक नायब तहसीलदार यांची कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करतील.
हे सर्व पथक डिस्ट्रिक्ट इन्सिडेंट कमांडरनिवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे नियंत्रणात काम करतील व कायदा व सुव्यवस्था बाबत नियंत्रण व समन्वय,क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणेक्षेत्रीय स्तरावर जिल्हा प्रशासनाचे आदेश पोहोचविणे व आदेश देणे,वाहतुकीमधील अडचणी असल्यास क्षेत्रीय स्तरावर संबंधितांना आदेश देणे यासाठी काम करतील,असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिलेला आहे.
00000

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि 28. मार्च: राज्यावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक निराश्रितगरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळावे यासाठी राज्यशासन व प्रशासन काम करीत आहे. तसेच, आरोग्य व्यवस्था व इतर वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहायता देणे हे मुख्यमंत्री सहायता निधीचे उद्दिष्ट आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधिमध्ये  मुख्यमंत्री कार्यालयमंत्रालयमुंबईयेथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे पोस्टल ऑर्डर/ मनी ऑर्डर द्वारे माध्यमातून धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात, https://cmrf.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन भरणा करता येतो,चेक किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटिजीएस किंवा एनईएफटीद्वारे प्रदान केल्या जाणा-या चलनमध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी एसबीआय संकलन शाखा ,जमा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे करावी. चेक किंवा डिमांड ड्राफ्ट संबंधित बँक / शाखेतून आरटिजीएस किंवा एनईएफटीद्वारे प्रदान केल्या जाणा-या चलन मध्ये दाता तपशील उल्लेख करून मुख्यमंत्री रिलीफ फंड एसबीआय संकलन शाखा जमा मुख्यमंत्री रिलीफ फंडच्या नावे करावी.
संकलन बँकेच्या  स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखाफोर्टमुंबई या शाखेवर  10972433751 / SBIN0000300  या खाते क्रमांक व आयएफएससी कोडचा वापर करून मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत करू शकता.
जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स, चंद्रपूर या संघटनेमार्फत रुपये लाखाचा धनादेश तसेच नाते आपुलकीचे संस्थेतर्फे संस्थेचे सदस्य प्रमोद उरकुडेजयंत देठेजितेंद्र मशाळकरहितेश गोहोकार यांच्या उपस्थितीत 31 हजारांचा धनादेश कोरोना  आजारावरील नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना  देऊन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली.
कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला ऑनलाइन मदत करावी. किंवा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये द्यायचा असल्यास फक्त दोनच व्यक्ती येऊन हा धनादेश द्यावा जेणेकरूनगर्दी टाळल्या जाईल व आपल्याला मदतही करता येईलअसे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
00000