Search This Blog

Wednesday, 26 May 2021

गत 24 तासात 674 कोरोनामुक्त


गत 24 तासात 674 कोरोनामुक्त,

278 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू

Ø आतापर्यंत 76,157 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 4,222

चंद्रपूर, दि.26 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 674 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 278 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 790 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 157 झाली आहे. सध्या  4 हजार 222 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 62 हजार 220 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 77 हजार 508 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 48 वर्षीय पुरुष, वरवट येथील 50 वर्षीय पुरुष, साखरवाही येथील 34 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील विजासन टेकडी परिसरातील 45 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील 65 वर्षीय महिला. मूल तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष. जिवती तालुक्यातील अासापूर येथील 65 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1411 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1307, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 278 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 74, चंद्रपूर तालुका 19, बल्लारपूर 50, भद्रावती 11, ब्रम्हपुरी 11, नागभिड 07, सिंदेवाही 08, मूल 18, सावली 06, पोंभूर्णा 02, गोंडपिपरी 06, राजूरा 10, चिमूर 02, वरोरा 28, कोरपना 21, जिवती 02 व इतर ठिकाणच्या 03 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

Tuesday, 25 May 2021

उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

 

उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.25 मे : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “ उद्योग क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी" या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यांकरीता दि. 28 मे 2021 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 या कालावधीत हिंगणघाट, वर्धा येथील जिमॅटिक कंपनीचे व्यवस्थापक शाकीर पठाण मार्गदर्शन करणार आहेत.

सदर ऑनलाईन मार्गदर्शन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर/वर्धा तथा आदिवासी उमेदवारांकरीता कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे.

तरी सर्व उमेदवारांनी स्वत: च्या अॅन्ड्रॉईड मोबाईलवर गुगल-मीट हे अॅप डाऊनलोड करावे तसेच meet.google.com/dih-xgnm-hck हि लिंक जॉईन करुन या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी 07172-270933/252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहाय्यक आयुक्त, भैयाजी येरमे यांनी केले आहे.

000000

गत 24 तासात 960 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 960 कोरोनामुक्त,

234 पॉझिटिव्ह तर 13 मृत्यू

Ø आतापर्यंत 75,483 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 4,627

चंद्रपूर, दि.25 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 960 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 234 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 512 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 75 हजार 483 झाली आहे. सध्या  4 हजार 627 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 59 हजार 496 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 75 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील रामपूर येथील 55 वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील 72 वर्षीय महिला, 48 ,50 व 72 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 65 वर्षीय महिला. गोंडपिपरी तालुक्यातील इंदिरा नगर येथील 85 वर्षीय पुरुष. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 80 वर्षीय पुरुष. तर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

  जिल्ह्यात आतापर्यंत 1402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1299, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 47, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 234 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 80, चंद्रपूर तालुका 24, बल्लारपूर 21, भद्रावती 14, ब्रम्हपुरी 02, नागभिड 12, सिंदेवाही 04, मूल 08, सावली 02, पोंभूर्णा 03, गोंडपिपरी 02, राजूरा 22, चिमूर 02, वरोरा 11, कोरपना 20, जिवती 05 व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

 कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक

रिक्षा चालकांना आर्थिक मदत

परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा

चंद्रपूर दि. 25 मे : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून रु.1500 एवढे अर्थसहाय्य देण्याबाबत दि.7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेले आहे.  सदरचा लाभ हा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यानुसार परवानाधारक रिक्षाचालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा असे आवाहन चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहे प्रक्रिया :

परवानाधारक रिक्षाचालकांना www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येईल. रिक्षाचालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नमूद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल तदनंतर ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील त्यांचा लाभ त्वरित संबंधित खात्यावर जमा होणार आहे. सदर ऑनलाईन प्रणालीमध्ये कोणाचेही बँक खाते क्रमांक विचारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अडचण आल्यास या क्रमांकावर साधा संपर्क :

ऑनलाइन अर्ज सादर करतांना वरील प्रणालीबाबत अडचण आल्यास चंद्रपूर,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  07172-272555 या  क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे कार्यालयामार्फत कळविण्यात आलेले आहे.

000000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि. 25 मे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दि.27 मे ते 29मे  2021 रोजी चंद्रपूर  जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार,दि.27 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:40 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सिंदेवाही, मूल व चिमूर तालुक्यातील जबरान धारकांच्या समस्येबाबत वने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.

दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोविड व म्युकरमायकोसिस संदर्भात आढावा बैठक. दुपारी 1:00 वाजता खरीप हंगामात खते व बी-बियाणे सुरळीत पुरवठा होणेबाबत उत्पादक कंपनी संबंधित अधिकारी व सहकारी संस्था यांच्यासमवेत आढावा बैठक. सायंकाळी 5:00 वाजता चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7:00 वाजता शासकीय निवासस्थान, रानफुल निवास,पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दि. 28 मे 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता गडचिरोली येथून निलसनी पेठगाव ता.सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता निलसनी पेठगाव ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट.सकाळी 10:20  वाजता जाम बु. ता. सावली व  सकाळी 10:40 वाजता जाम रैयतवारी ता. सावली येथे सांत्वनपर भेट देतील. सकाळी 11:30 वाजता व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित.

दुपारी 1:30 वाजता व्याहाड खुर्द ता. सावली येथून सिंदेवाहीकडे प्रयाण करतील. दुपारी 2:15 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दुपारी 2:45 वाजता श्रावण लाॅन,सिंदेवाही येथे काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 6:30 वाजता सिंदेवाही येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम राहतील.

शनिवार,दि. 29 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता ब्रह्मपुरी येथून आरमोरी जि.गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:00 वाजता  आरमोरी जि. गडचिरोली येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 4:00 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:30 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम.

00000