स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : विशेष वृत्त
महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत अंतर्गत
जिल्ह्यातील 24 हजार नागरिकांवर मोफत उपचार
Ø 32 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचारावर शासनाकडून 50 कोटी खर्च
चंद्रपूर, दि. 28 : सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सामान्य नागरिकांना विविध आजार आणि शस्त्रक्रियांवर होणारा खर्च झेपत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार उपलब्ध करून देऊन दिलासा दिला आहे. या दोन्ही योजनेंतर्गत जिल्ह्यातील 24051 रुग्णांना स्वत:जवळचा एकही पैसा खर्च न करता मोफत उपचार मिळाले आहे. त्यांच्या उपचाराची 50 कोटी 45 लक्ष 41 हजार 275 रुपयांची रक्कम शासनाने जमा केली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. सुधारीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत केंद्राची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात दि. 1 एप्रिल 2020 पासून एकत्रित लागू झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या सुरवातीपासून जिल्ह्यात दोन्ही योजनेंतर्गत आतापर्यंत 24051 रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने 50 कोटी 45 लक्ष 41 हजार 275 रुपये खर्च केले आहे.
रुग्णांना मिळालेले उपचार व शस्त्रक्रिया : जळालेले केसेस 29 रुग्ण, कार्डीयाक ॲन्ड कॉर्डीयोथेरॉयिक सर्जरी 577 रुग्ण, कार्डीओलॉजी 1259, क्रिटीकल केअर 74, डरमॅटोलॉजी 22, ईएनटी सर्जरी 357, एंडोक्रिनोलॉजी 134, जनरल मेडीसीन 59, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी 135, जनरल सर्जरी 834, गॅयनोकॉलॉजी ॲन्ड ॲबस्टेस्ट्रिक सर्जरी 376, जेनिटोरीनरी सर्जरी 524, हेमॅटोलॉजी 24, इंटरव्हेंशनल रेडीओलॉजी 165, इनव्हेंस्टीगेशन 288, मेडीकल ऑनकॉलॉजी 7846, नेफ्रॉलॉजी 1655, न्युरॉलॉजी 184, न्युरोसर्जरी 458, ॲपथमॅलॉजी सर्जरी 1014, आर्थोपेडीक सर्जरी 866, पेडीयाट्रीक कँन्सर 7, पेडीयाट्रिक सर्जरी 318, पेडीयाट्रिक्स मेडीकल मॅनेजमेंट 473, प्लॅस्टिक सर्जरी 7, पॉलीट्रॉमा 2076, प्रोस्थेसेस 4, पलमनोलॉजी 1865, रेडीएशन अँकोलॉजी 1326, हृयुमॅटोलॉजी 1, सर्जकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी 37 आणि सर्जीकल अँकोलॉजीचे उपचार 1057 अशा एकूण 24051 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment