Search This Blog

Friday, 13 May 2022

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Ø 31 मे पुर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 13 मे : आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी दि. 31 मे 2022 पुर्वी अर्ज मागविण्यात येत आहे.

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज जवळच्या एकलव्य रेसिडेंशियल स्कूल व शासकीय आश्रम शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तसेच प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment