Search This Blog

Friday 13 May 2022

जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्रामतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिर



 

जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्रामतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिर

Ø कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी

चंद्रपूर, दि. 13 मे: जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, कारागृह अधीक्षक वैभव आगे, एन.सी.डी समन्वयक डॉ.पद्मजा  बोरकर तसेच टाटा ट्रस्टचे व्यवस्थापक डॉ.आशिष बारब्दे उपस्थित होते.

कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिरामध्ये कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका, दंतचिकित्सक यांच्यामार्फत कैद्यांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदाब, मधुमेह, मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यात आली.

यावेळी सदर शिबिरात उपस्थित महिला व पुरुष कैद्यांना मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले व सर्वांनी तपासणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

कर्करोगाची लक्षणे तसेच कर्करोग आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या महत्त्वाच्या बाबींवर डॉ.वैदेही लोंखडे व डॉ. अदिती निमसरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले व उपचाराविषयी माहिती देण्यात आली. सूरज साळुंके यांनी प्रास्ताविकेतून या शिबिराच्या आयोजनाचा हेतू विशद केला. सदर शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.

00000

No comments:

Post a Comment