Search This Blog

Friday, 20 May 2022

धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची 31 मेपर्यंत मुदतवाढ

 


धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची 31 मेपर्यंत मुदतवाढ

            चंद्रपूर, दि.20 मे: रब्बी हंगाम 2021-22 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची मुदतवाढ दि. 31 मे 2022 पर्यंत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2021-22 मधील धान शासनाला आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत विकावयाचे आहे, अशा शेतकऱ्यांनी दि. 31 मे 2022 पर्यंत आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह जाऊन नोंदणी करावी. व धान खरेदीकरिता शेतकरी नोंदणी मुदतवाढीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment