Search This Blog

Friday, 13 May 2022

अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

 


अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 13 मे: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकरिता दोन शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी भीवकुंड, विसापूर, ता. बल्लारपूर येथे जून 2012 पासून वर्ग 6 ते 10 सेमी इंग्रजी माध्यमाची मुलांची निवासी शाळा तर चिमूर येथे मुलींची निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेमध्ये वसतिगृहाची सोय केलेली असून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, निवासी व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शाळेत प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप दि.15 एप्रिल ते 31 मे 2022 या कालावधीत तर अर्ज स्वीकृती दि. 10 जून 2022 पर्यंत सुरू राहील.

तरी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी वर्ग 6 तसेच वर्ग 7 ते 10 च्या रिक्त जागेवर प्रवेशासाठी संबंधित शाळेत संपूर्ण तपशिलासह अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment