Search This Blog

Wednesday, 25 May 2022

रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित रक्तदाबाची तपासणी करावी


 

रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित रक्तदाबाची तपासणी करावी

Ø जागतिक उच्च रक्तदाब दिन व सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर दि. 25 मे : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे औचित्य साधून सीपीआर या जीवनरक्षक तंत्राचे प्रात्यक्षिक व फुप्फुसीय पुनर्जीवन आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, छातीरोग तज्ञ डॉ. सौरभ राजूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती राजगोपाल, एन.सी.डी जिल्हा समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर, पी.एस. पोडे, रामेश्वर बारसागडे एन.सी.डी कर्मचारी व अधिपरिचारिका प्रामुख्याने उपस्थित होते.

आजच्या धावपळीच्या काळात नागरिकांनी त्यांचे आरोग्य जपावे, उच्च रक्तदाबामुळे हृदय धमन्याचे आजार, पक्षाघात यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. सध्याच्या परीस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. रक्तदाब नियंत्रणासाठी उपाय म्हणून नियमित रक्तदाबाची मोजणी करावी, रक्तदाब नियंत्रित ठेवावा. व्यायाम, प्राणायाम, योगा, सकस आहार इत्यादींचा अवलंब करावा. 30 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रक्तदाबाची तपासणी करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदाबाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी सी.पी.आर प्रशिक्षणात छातीरोग तज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांनी आकस्मिक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सीपीआर कसे द्यायचे, याबाबत जीवनरक्षक तंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आपात्कालीन परिस्थितीत रुग्णाला आक्सीजन मिळू शकत नसल्यास छातीवर दाब देऊन किंवा तोंडाद्वारे श्वास देऊन जीव वाचवण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालयातर्फे आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.                                       उच्च रक्तदाबामूळे हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर निदान होन नियंत्रण करणे व लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

००००००

No comments:

Post a Comment